MSRTC Bharti महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठी भरती

MSRTC Bharti कोल्हापूर विभागात कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, आजरा, संभाजीनगर, गारगोटी, चंदगड, कुरुंदवाड, राधानगरी, गगनबावडा व आजरा असे आगार असून, विभागातील गाड्यांची एकूण संख्या ७१७ इतकी आहे. त्यामानाने वाहक व चालकांची संख्या पूर्णपणे भरलेली नाही. शासनस्तरावर पदांच्या भरतीसाठी वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल ॲटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनर, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वेल्डर अशा विविध ३१० पदांसाठी यंदा जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही पदे केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी असतील, असे नमूद करण्यात आले होते.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा 

विशेष म्हणजे त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही पदे भरण्यात असली, तरी ती कायमस्वरूपी भरणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील पदांची भरती न झाल्याने त्याचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यशाळा असो किंवा वाहतूक त्याची स्थिती याहून निराळी नाही. राज्यातील MSRTC Bharti अन्य विभागांशी स्पर्धा करताना कोल्हापूर विभागाला येत्या मार्च २०२५ पर्यंत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचे आव्हान पेलायचे आहे. ते पेलण्यासाठी पदांची भरती होणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, इतकीच प्रवासी वर्गाची अपेक्षा आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा 

Leave a Comment