Student Loan

विद्यार्थी कर्ज कसे घेऊ शकतात?

तुमचे कोणतेही उत्पन्न नसले तरी तुम्ही कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचे आई-वडील किंवा काम करणाऱ्या भावंड किंवा मित्राची गॅरेंटर म्हणून आवश्यकता असेल. जामीनदार ही अशी व्यक्ती असते, जी कर्जासाठी जबाबदार असते. जर कर्जाची परतफेड करण्यात काही अडचण आल्यास कर्ज फेडण्यास जामीनदार जबाबदार असतो. याशिवाय जर तुम्ही पार्ट टाइम जॉब, फ्रीलान्सिंग किंवा इतर कोणत्याही कामातून पैसे कमवत असाल तर कर्ज मिळणे थोडे सोपे होऊ शकते.

उत्पन्नाशिवाय कर्ज कसे मिळवायचे?

तुमचे कोणतेही स्थिर उत्पन्न नसेल, तरीही तुम्ही कर्ज घेऊ शकता. परंतु, यासाठी तुमचे आई-वडील किंवा भावंडांना जामीनदार व्हावे लागेल. याशिवाय, जर तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा अर्धवेळ कामातून थोडेसे कमावत असाल तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. या स्थितीत कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.